बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईडी, सीबीआयचा वापर हा तर पाठीतला वार, ही महाराष्ट्राची परंपरा नाही”

नवी दिल्ली | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नको व्हायला हवी होती. पण कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे, त्याचे प्रश्न दिल्लीत विचारले जातात. याबाबत एकतर विधीमंडळ सचिव, संसदीय कार्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. मी अथॉरिटी नाही. याबाबतचं उत्तर मी देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना ईडीच्या कारवायांवरही टीका केली. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही, अशी टीका राऊतांनी केलीये.

आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर…- जयंत पाटील

ठाकरे सरकार पाडण्याचा नाही तर आम्ही दुसराच प्लॅन आखतोय, दानवेंनी भाजपचं सिक्रेट फोडलं!

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

फडणवीस, अमित शहांची गुप्त बैठक, नंतर मोदींशी चर्चा, ठाकरे सरकारवर अस्थिरतेचं ढग?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More