बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता तोंड उघडायला तयार नाही”

मुंबई | महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय? कधी काळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणाबाजी करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालिन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

सीएनजीसोबतच घरगुती पाइपलाइन गॅसची किंमतही प्रत्येक युनिटमागे 55 पैशांनी वाढवण्यात आली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचारात वापरलेली ‘बहोत हो गई महंगाई की मार…’ या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच नजरेस पडत नाही, असा टोलाही शिवसेेनेनं मोदी सरकारला लगावला आहे.

पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलांपर्यंत, बियाणांपासून खतांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाही, असं म्हणत राऊतांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती; असा करा अर्ज

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर….- प्रविण दरेकर

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला जमावाकडून बेदम मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More