बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत”

मुंबई | भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालीये, अशी टीका शिवसेनेनं केलीये. तसेच महाराष्ट्राला कमजोर करायचं, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत आणि महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रावर लोड शेडिंग म्हणजे अंधाराचे संकट कोसळतान दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्याबाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतील उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली का? नागरिकांचा केंद्र सरकारवर विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे व्यापारी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते, असं टीकास्त्र शिवसेनेकडून भाजपवर सोडण्यात आलं आहे.

एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाबाबत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरु असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

पालिका निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर!

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More