महाराष्ट्र मुंबई

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मुंबई | राज्यपालांचा पॉलिटकल एजंटसारखा वापर करून आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये परिस्थिती अस्थिर करणं हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवार संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना ‘निपट डालो’ हा अजेंडा भाजप राबवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणं घटनाविरोधी नाही, ही गोष्ट दिल्लीतील राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संबंधित राज्यातील सरकार अस्थिर करायचं, हे धोरण चांगल्या राज्यकर्त्याला शोभत नाही, असं म्हणस संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या-

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात

परिवहन मंत्री अनिल परब यांची उपचारांनंतर कोरोनावर मात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या