महाराष्ट्र मुंबई

अर्णब प्रकरणी दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल- संजय राऊत

मुंबई | अर्णब प्रकरणी दिल्लीत काय हालचाली सुरू होत्या हे सत्य मी जर मांडलं तर सर्वांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अर्णब गोस्वामींसाठी काल भाजप रस्त्यावर उतरली होती. अर्णब त्यांचे कार्यकर्तेच असावेत अशा आविर्भावात हे आंदोलन सुरू होतं, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.

गोस्वामींना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

यावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि गोस्वामींच्या न्यायालयीन कोठडीचा संबंध काय?, असा सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘त्या’ 9 पोलिसांना निलंबित करा; राम कदम यांची राज्यपालांकडे मागणी

“एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटं ठरवताय?”

दिल्लीत महाराष्ट्र सदनाबाहेर झळकले ‘महाराष्ट्रात आणीबाणी 2.0’ चे पोस्टर्स!

“अर्णब गोस्वामी भाजपचे प्रवक्ते म्हणूनच भाजप रस्त्यावर”

“जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र, तसं ‘ते’ भाजपचं चॅनेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या