महाराष्ट्र मुंबई

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत

मुंबई | देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलंय.

देशात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इतर विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीने लढताना दिसत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा अशी नाही, असंही राऊत म्हणाले.

ज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्राचं अजिबात पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहेच, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी हीच परिस्थीत आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप

रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!

मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!

“विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झालीये”

तेजस ठाकरेंची दमदार कामगिरी; चन्ना प्रजातीचा शोध

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या