बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार”

मुंबई | मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत कळेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो, असंही राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास आम्ही…”

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

‘पुढचे 3 महिने अत्यंत महत्वाचे’; केंद्र सरकारने नागरिकांना केलं हे महत्त्वाचं आवाहन

“मराठवाडा वाॅटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी”

“आपण सर्व भारतीय पंतप्रधान मोदींना हे गिफ्ट देऊयात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More