बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यानंतर भाजप नेते आणि संभाजीराजे यांच्यात मतभेद वाढताना दिसत आहेत.

भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत. तसेच केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

संभाजीराजे छत्रपती हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करुन घेतली आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना या उपकाराची आठवण करुन दिली. त्यामुळे आता छत्रपती काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली, ही गोष्ट लोकांना रुचलेली नाही. त्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“एक रुपया इंधन दरवाढ झाली की आंदोलने करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे लपलेत?”

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More