मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरुन सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे यांना नुकतच एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावरुनच संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीये.
दादांनी पत्र लिहिणं म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठं काम चंद्रकांत पाटलांना करावं लागणार आहे, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.
चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे, असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत, पण चायपेक्षा किटली गरम असं काही लोकांचं सुरु आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.
थोडक्यात बातम्या-
माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन
“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”
“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”
क्रूरतेचा कळस! सांगवीत पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…
“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”