बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण…- संजय राऊत

नवी दिल्ली | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

अनिल देशमुख आणि राज्य सरकार पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असं म्हणत आहे. चौकशीला कोणीही नकार दिलेला नाही. फक्त राज्याचे विरोधी पक्षनेतेच याला विरोध करत आहेत. आधी चौकशी नव्हे तर आधी फाशी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीस यांच्या राजवटीत त्यांनी अशा किती नेत्यांना फाशी दिली, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

याप्रकरणात फार काही घडणार नाही, याचा फार चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याची गरज नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाष्य केलं. रखडलेल्या महाविकासआघाडी सरकारने सुचविलेल्या 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्याकडून आम्ही अभ्यास करतोय, असं सांगितलं जात आहे. बहुधा ते 12 आमदारांच्या नियुक्तीविषयी पीएचडी करत असावेत. तसेच 12 आमदारांची नावं किती जास्त काळ मांडीखाली दाबून ठेवता येतील, याचा विक्रम राज्यपालांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा असेल, अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

 संतापलेल्या हत्तीचा फोटो काढणं बेतलं असतं जिवावर, पाहा व्हिडिओ

‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशांत धावेल एक किलोमीटरपर्यंत; जाणून घ्या किंमत

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर

मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More