बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा शिवसेनेकडे तुमच्या घरावर फेकण्यासाठी खूप दगड आहेत- संजय राऊत

मुंबई | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतवर निशाणा साधलाय.

‘शीशे के घरों में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर नहीं फ़ेंकते’, या डायलॉग सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही चूक केली असेल, अप्रमाणिकपणे वागला असाल तर शांत बसण्यातच शहाणपण आहे. अन्यथा शिवसेनेकडे तुमच्या घरावर फेकण्यासाठी खूप दगड आहेत, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

‘मी येते, तुम्हाला जे उखडायचेय ते उखाडा’, असं आव्हान कंगणाने दिलं होतं. एक महिला म्हणून मुंबई महानगरपालिकेने तिच्या इच्छेचा मान ठेवला आणि तिचे अनधिकृत कार्यालय पाडलं, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘सामना’मध्ये ‘उखाड दिया’, अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. ही ‘सामना’ची स्टाईल आहे, त्यामध्ये काहीही चूक नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील- संजय राऊत

दिवाळीला ‘सॅल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया; पंतप्रधान मोदींचं आवाहन

संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप

‘मलाही मुलगी आहे, मी नेहमीच स्र्त्रीयांचा सन्मान केला’; छेडछाडीच्या आरोपांवर विजय राज यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More