बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

मुंबई | लोकांवर पाळत ठेवण्यासाठी ‘पेगॅसस’ला कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले. हा अर्थपुरवठा करणारे कोण, याचा तपास कोणी लावल काय?, असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केला आहे.

राजकारण किती गढूळ झालं आहे याचं दर्शन आता रोजच होत आहे. दिल्लीत ते जरा जास्तच होत असतं. राजकारणात स्वतःची सावलीही अनेकदा आपली नसते. असं गूढ वातावरण आपल्याभोवती निर्माण झालं आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पेगॅसस या ‘ऍप’द्वारा ही अशी हेरगिरी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी देशातील एका मोठ्या उद्योगपतीस भेटलो. त्यांच्या हातातील फोन हा अत्यंत सुमार दर्जाचा, जुना, ‘डबरा’ फोन म्हणावा लागेल. त्या फोनवर इंटरनेट, वायफाय, व्हॉट्सऍप अशी कोणतीच सेवा येत नाही. मी हल्ली हाच फोन वापरतो. मोठे फोन हे सहज ‘टॅप’ केले जातात. सध्या काहीच भरवसा नाही. फोनमध्ये वायफायद्वारे एक ऍप घुसवून जगभरात हेरगिरी सुरू आहे. सावध असले पाहिजे!. हे त्या उद्योगपतींनी सांगितलं. ते पेगॅसस प्रकरणाने सिद्ध केलं, असंही संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या माहितीनुसार ‘एनएसओ’ पेगॅससच्या लायसन्ससाठीच 7-8 दशलक्ष डॉलर म्हणजे वर्षाला साधारण साठ कोटी रुपये वसूल करते. एका लायसन्सला 50 फोनवर हेरगिरी करता येते. म्हणजे 300 फोनच्या हेरगिरीसाठी सहा ते सात लायसन्सची गरज पडते. म्हणजे साडेतीन ते चार अब्ज रुपये वर्षाला खर्च झालाच आहे. हा रिपोर्ट 2019 चा आहे. 2021 पर्यंत त्या खर्चात नक्कीच वाढ झाली आहे. देशातील 300 लोकांवर पाळत ठेवण्यासाठी इतके अब्जावधी रुपये कोणाच्या खिशातून गेले?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं- तुकाराम मुंढे

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

काय सांगता! अवघ्या 23व्या वर्षी ‘ही’ महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांची अपेक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More