बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शांत असलेले राऊत अखेर बोलले; “या भाडोत्रींनी भाजपलाच नागडं…”

मुंबई | महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे या बेताल वक्तव्यांवर नेमकं काय म्हणणं आहे? नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं त्याचा अनुभव भाजप सध्या घेत आहे. ‘केले तुका आणि झाले माका’ असेच त्यांचे दशावतार यानिमित्ताने झाले आहेत, असं राऊतांनी म्हटलंय.

केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्रीय सरकारची मान शरमेने खाली झुकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. राणे यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचं वक्तव्य मोदी-शहांनी गांभीर्याने घेतलंच पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत आणि हे लोक पवारांवरही ऊठसूट हल्ले करत आहेत. एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उड्या मारीत आहे, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, संजय राऊत राणेंना अग्रलेखात काय काय म्हणाले?

कोर्टात घडली महत्त्वाची घटना, फक्त ‘या’ एका कारणामुळे राणेंना जामीन मिळाला?

न्यायालयाने नारायण राणेंना जामीन मंजूर केला, मात्र ‘या’ अटी देखील घातल्या!

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं पहिलं ट्विट, म्हणाले,

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More