बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  मोदी हे स्वत:ला फकीर म्हणवतात. मग त्यांनी दिल्लीत 15 एकरांचे घर बांधण्याचा उपद्व्याप कशासाठी चालवला आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. ब्रिटनमध्ये कोरोना नियंत्रणात आला नाही तर जॉन्सनसाहेब वेळ घालविण्यासाठी चौथ्यांदा आणि पाचव्यांदाही बोहल्यावर चढतील. तर दिल्लीत कोरोना काळात नवं संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवं घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गरीबांना काय जॉन्सनप्रमाणे तिसरं लग्न करता येत नाही व नवं घरही बांधता येत नाही, पण अशा प्रकरणांच्या कथानकात ते चांगला वेळ घालवतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मेहुल चोक्सी हा भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. 2022 च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना भारतरत्नही दिलं जाईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…

ह्रदयद्रावक! कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More