मुंबई | देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवं, असा टोला देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावं, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावं. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले. त्यात कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे. ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसं व्हायचं? पंतप्रधान देशाचे आहेत, असं राऊत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”
नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी
एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”
धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…