बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्या शिवाय राहणार नाही- संजय राऊत

मुंबई | भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली. ते माहीममध्ये राजा बढे चौकात भाजप कार्यालयाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी बोलताना नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे, असं नितेश राणे म्हणालेत. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काही लोक गांजा ओढून बोलतात असं मी कुठेतरी ऐकलं आहे, असं खोचक प्रत्युत्तर संजय राऊत यांनी नितेश राणेंना दिलं आहे. महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही, असं ट्विटही राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेला वाटत की आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं ट्विट करत लाड आणि नितेश राणे यांच्यावर राऊतांनी बोचरी टीका केली.

थोडक्यात बातम्या-

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More