महाराष्ट्र मुंबई

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

मुंबई | ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. या ना त्या मुद्द्यांवरून सरकार विरूद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील भाजपच्या मर्जीनुसार कारभार हाकतात, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

भगतसिंह कोश्यारी गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. ते केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील होते. तथापि, ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून नेहमीच कोणत्या तरी कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. ते नेहमी वादात का असतात?, असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

राज्य सरकारने विमान उड्डाणासाठी परवानगीच दिली नव्हती, तर ते विमानात बसलेच कसे?, असा सवाल शिवसेनेनं आपल्या अग्रलेखात विचारला आहे.

केंद्र सरकारला जर वाटत असेल की राज्यातील काजकारण संविधानिक कायद्यांनुसार चालावं, तर भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घ्या, असं शिवसेनेनं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

“धर्म परिवर्तन करणाऱ्या दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही”

लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील

“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या