बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात, अश्रूंचा बांध फुटतो, ते बरं चालतं”

मुंबई | पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान बिरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरून त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केलं. यात ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रेलाखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबड्या घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील आणि सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्द्यांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे, अशी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.

पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममतांच्या पायास जखम झाली हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न, असा टोला शिवसेनेनं अग्रलेखातून मोदींना लगावला आहे.

प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली, संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”

“पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”

रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी

नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More