बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

मुंबई | बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिशा दिली. काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवतात. त्यांच्या नावानं संसदेत जातात, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशात दोनच दैवतं आहेत, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आज देशात विचार आणि माणूस संपवण्याचं काम केलं जातं आहे. त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. यावरून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. आम्ही जनतेचा आवाज ऐकतो. खरंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, पण तरीही राजीनामा घेतला, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मुंबईत मोहन देलकर यांनी आत्महत्या केली. त्यांना वाटलं असेल मुंबईत आत्महत्या केल्यानं त्याचा तपास होईल. त्यांच्या आत्महत्येमागे गुढ आहे. त्यांच्या आत्महत्येला आम्ही न्याय देऊ. त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास होता. त्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत. त्यामध्ये भाजपच्या लोकांची नावं आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”

‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज

‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More