देश

सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी; संजय राऊतांकडून मोदींची कानउघाडणी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशरात जनतेने थाळ्या, घंटा, शंख वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. प्रिय पंतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलत तर असेच होणार, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. कृपा करून स्वत:ला वाचवावे, आपल्या कुटुंबीयांना वाचवावं. सरकारच्या सूचनांचे नीट पालन करावं. राज्य सरकारांना माझी विनंती आहे की, लोकांकडून नियम आणि कायद्यांचं पालन करून घ्यावं, असं आवाहन केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“झट की फट निर्णय घेणाऱ्या मोदींनी आता इतका वेळ का लावला?”

“मुख्यमंत्र्यांनी फक्त भावनिक भाषण करुन काहीही होणार नाही”

महत्वाच्या बातम्या-

अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो; ट्रम्प चीनवर संतापले

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या