बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांना टोला लगावला होता. त्यावर आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्या संधी मुख्यमंत्र्यांना आहेत, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेता व्हावं असं राऊतांना वाटत असेल, तर ते चांगलंच आहे. मुख्यमंत्र्यांनी नक्की मोठा राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठा नाही, असं राऊतांना वाटतं, असा टोला फडणवीसांनी राऊतांना लगावला होता. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

कोण काय बोलतंय त्याला उत्तर देयला मी बांधिल नाही. मी काय बोलतोय हे आधी त्यांनी समजून घ्यावं, अशी टीका संजय राऊतांनी फडणवीसांवर केली आहे. या देशात एकापेक्षा अधिक नेते असू शकत नाही का?, या देशात अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी आणि शरद पवार भेटीवर देखील संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांना आम्ही राजकारणातील भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद शरद पवारांकडे नक्कीच आहे, असं सुचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ए तु थांब रे… मध्ये बोलू नको’; नारायण राणेंनी दरेकरांना झापलं, पाहा व्हिडीओ

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; ममतांच्या ‘या’ मागणीवर मोदी म्हणाले ‘मी बघतो’

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; रस्त्याच्या कडेला बसलेल्या 18 कामगारांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More