बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत

मुंबई | भारत आणि इंग्लंडच्या कसोटी सामन्यापूर्वी जगातील सर्वात मोठया स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या स्टेडियमच्या नावावरून सध्या मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल असं नाव ठरलेल्या स्टेडियमला नरेंद्र मोदी असं नव्याने नाव देण्यात आल्याने अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया देण्याचा तगादा लावला आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर व्यक्त होत आपल्या विशेष शैलीत मोदींवर टीका केली आहे. “मोदी हे आता मोठे नेते झाले आहेत, मला ते आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत”, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.

अशा एखाद्या निर्णयाबद्दल एखादा राजकीय पक्ष जास्त काही बोलु शकत नाही, नामांतराची प्रक्रिया ही प्रत्येक राज्यात होत असते. शिवाय, त्या राज्याच्या क्रिकेट संघटनेने आणि सरकारनेही त्याला परवानगी दिली आहे, असंही ते यावेळी बोलले.

भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठं एक स्टेडियम असायला पाहिजे असं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पाहिलं होतं ते आता सत्यात उतरत आहे. उद्घाटन समारंभप्रसंगी या स्टेडियममुळे अहमदाबादची जागतिकस्तरावर वेगळी ओळख तयार होईल असं राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी बोलुन दाखवलं आहे.

थोडक्यात बातम्या

अभिनेत्री निया शर्माचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More