Top News महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत, त्रागा करु नका; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या

मुंबई  | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी साेमय्यांवर हल्ला चढवला होता.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी या वादात उडी घेतली आहे. राम कदम म्हणाले की, “किरीट सोमय्या यांनी दस्तऐवज दाखवत आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्रागा करु नये”.

तसेच थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपाला उत्तर द्या, असे आव्हानही राम कदम यांनी संजय राऊत यांना केले आहे.

संजय राऊतांबद्दल मला व्यक्तीशः अत्यंत आदर आहे. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी प्रश्नाचे उत्तर दिले का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक

ठाकरे कुटुंबावरील आरोपांनंतर संजय राऊतांची किरीट सोमय्यांना वॉर्निंग, म्हणाले…

मला विधान परिषदेचा शब्द देण्यात आलेला- मेधा कुलकर्णी

उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक; अशोक चव्हाणांकडून जाहीर कौतुक

कृणाल पंड्याच्या बॅगेत सापडली महागडी घड्याळं; मुंबई विमानतळावर 3 तास केली चौकशी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या