महाराष्ट्र मुंबई

“राज्याचं वातावरण बिघडवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला पण मुख्यमंत्र्यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद”

Loading...

मुंबई |  महाराष्ट्राचे वातावरण बिघडविणाऱ्या टोळधाडी कोणत्याही थराला जातील हे आता स्पष्ट झाले आहे. या टोळधाडींना ज्या कुणाचा आशीर्वाद असेल तो असू द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे, असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पालघर प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना टोले लगावले आहेत. महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. मात्र इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला, असं त्यांनी म्हटलं आहे.

पालघरमधील साधूंना संपवणं हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱ्या शेकवीत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लॉकडाऊनमुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाली आहे. यावर एखादे चॅनल डिबेट का करत नाही? व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊनकरून गप्प का बसले आहेत? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या