Top News महाराष्ट्र मुंबई

फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत महाराष्ट्र भाजपवर प्रसंगी केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आजच अग्रलेख लिहून विरोधकांना तिर्थक्षेत्री गुजरातला एकदा पाठवायला हवं, असा टोला मारणाऱ्या राऊतांनी आता फेसबुक पोस्ट करून राजकीय वातावरण चांगलंच तापावलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची संख्या खूपच झपाट्याने वाढते आहे. कोरोनाला आळा घालण्यात ठाकरे सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं भाजप नेत्याने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर  करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे, असा खोचक टोला राऊत यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे, असा सल्ला देत महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील, असा इशारा देखील राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून विरोधकांना दिला आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर ते मातोश्रीला देखील गेल्याचं समोर आलं आहे. खुद्द शिवसेना नेते आणि खासदार संदय राऊत यांनीच तसं सांगितलं आहे. राज्यात कोरोनाचं संकट अधिक गहिरं होतं आहे. अशातच पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

प्रत्येक गरीबाच्या खात्यावर दरमहा हजार रुपये जमा करा!

‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

महत्वाच्या बातम्या-

राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तर द्या- रोहित पवार

“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचा असेल हे आम्ही खात्रीने सांगतो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या