बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करावा; संजय राऊतांच्या पत्राने राज्यात खळबळ

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी चालू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडीला पुरावे दिले होते. परिणामी आता खासदार संजय राऊत यांंनी किरीट सोमय्या यांना पत्र लिहून मोठा घोटाळा बाहेर काढण्याचं आवाहन केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. सोमय्या यांनी पिंपरी चिंचवडमधील 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीला विनंती करावी, अशी मागणी राऊत यांनी पत्राद्वारे सोमय्या यांच्याकडं केली आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात सध्या संजय राऊत यांच्या पत्राची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीशी निगडीत कंपनीनं 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या घोटाळ्यासंदर्भात सर्व माहिती माझ्याकडे आहे असंही म्हटलंय. संजय राऊत यांनी विस्तृत पत्र लिहून सोमय्या यांच्याकडून कारवाईची मागणी केली आहे. परिणामी राज्यभरातील विविध घोटाळे बाहेर काढणारे सोमय्या आता आपल्याचं पक्षाची सत्ता असणाऱ्या महापालिकेच्या कारभारात हात घालणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते, असा दावा राऊत यांनी केला आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात राऊत यांच्या या पत्रानं खळबळ उडाली आहे.

पाहा पत्र –

थोडक्यात बातम्या 

तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स

सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More