बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दानवे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते, तेव्हा सर्व काही सुरळीत होतं”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात भाजप नेत्याला भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यानंतर या भाषणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली  आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात उपस्थितीत आजी-माजी सहकारी आणि एकत्र आले तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. त्याचबरोबर त्यांनी आजी सहकारी व्हावं. त्यांनंतर जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका, असं संजय राऊत म्हणाले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलवलं आहे. मीही त्यांना अनेकदा भेटतोय, दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं असेल तर चांगलंच आहे. रावसाहेब दानवे अजातशत्रू आहेत. त्यांचे देशात अनेक मित्र आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांवर राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सुचक वक्तव्यांवर राज्यात पूढे काय घडामोडी घडणार आहेत, ते आता पाहाव लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

“संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More