“सरकार टीकेल किंवा जाईल पण शरद पवारांबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही”
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर आमदारांना इशारा दिला. यावर आक्षेप घेत भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकीवजा इशारा दिला. शिंदे गटातील आमदाराच्या केसालाही धक्का लावल्यास घराबाहेर पडणं मुश्किल होईल, असं राणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना धमकी देणारे महाराष्ट्रात कोणी असेल तर त्याचा विचार मोदी आणि शहांना करावा लागेल. जगभरात शरद पवारांना मान आहे. चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी अशा नेत्यांला धमक्या देणं चुकीचं आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसं जाहीर करा. सरकार टीकेल किंवा जाईल,पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असं ट्विट् करत पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटला संजय राऊतांनी टॅग केलंय.
आता भाजपचे काही लोक धमक्या देत आहेत. शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढला आहे. यापूर्वीही या लोकांनी उद्धव ठाकरे, बाळासाहेव ठाकरे यानांही या लोकांनी धमकी दिली होती. देऊ द्या ही त्यांची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का? असा प्रश्न मी विचारलाय?, असंही ते पुढे म्हणाले.
थोडक्यात बातम्या
‘त्यांचा माज वाढलाय’; नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यावर संजय राऊत संतापले
“महाविकास आघाडी सरकार पडतंय त्याचं मला दुःख नाही फक्त…”
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने शिंदे गटाला मोठा धक्का!
’50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं’; निलेश राणेंचा पवारांना टोला
“शिवसेनेनं यापूर्वीही अशी गद्दारी पचवली, पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”
Comments are closed.