‘तुमच्या तोंडात काय बोळा कोंबलाय का?’; संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुद्यावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, महाराष्ट्राच्या जागांवर हक्क सोडणार नाही असा ठराव मांडला आहे. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची कधी झाली, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

भूखंडाच्या मुद्यावर तासभर बोलायला तयार असता, पण कर्नाटकच्या मुद्यावर बोलायला तयार नाही, तुमच्या तोंडात कुणी बोळा कोंबला आहे का? संजय राऊत शिंदेंवर भडकले.

अमित शहांसोबत बैठक झाली तरी हे बोम्मई उठतात आणि महाराष्ट्राच्या तोंडात मारता आणि आपले मुख्यमंत्री गाळ चोळत अधिवेशनाला जातात, असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला आहे.

महाराष्ट्राचं सरकार घाबरलंय असं वाटतंय, यांना कुणाची तरी भीती वाटत आहे. तुम्ही भूमिका घ्या, आम्ही सगळे तुमच्या पाठिशी उभं राहू. पण हे भूमिकाच घेत नाही. कर्नाटकवर काहीच बोलत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.

अमित शहा यांनी बोलावलं होतं, त्यावेळी गुंगीचे इंजेक्शन दिलं होतं, त्यावर न बोलण्याचं सांगितलं आहे का, असं असेल तर स्पष्ट करा. ग्रामपंचायतीमध्ये गावावर दावा करत आहात, आधी राज्यातील गावं चालली आहे ते पाहा, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना सुनावलंय.

महत्त्वाच्या बातम्या-