बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दैनिक सामनाचा संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत”

मुंबई | एल्गार परिषद प्रकरणातील संशयित आरोपी स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्या प्रकारे इंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या तसंच पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावाई शोध राऊत यांनी लावला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलं आहे. वाघ यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नक्षलवाद्यांना चिनी ड्रॅगन रसद पुरवत असतात पण मोदी त्यांना घाबरत नाही, मग यांना स्वप्नात सुद्धा घाबरतील का? समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोध करणे याला घाबरणे कसं म्हणणार, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दैनिक सामना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आला. पण त्यांच्या विचारांना बगल देत संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपींना राऊत आपल्या लेखणीतून बळ देत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

शनाया कपूरचा हॉट अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे- रामदास आठवले

‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने सुनिल शेट्टींची इमारत सील!

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More