बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला

मुंबई | रविवारी दिवसभर शिवसेनेचे( Shivsena)खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची ईडीकडून(ED) चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान संजय राऊतांच्या निवासस्थानातून 11 लाख 50 हजार रूपयांची रक्कम  ईडीने ताब्यात घेतली आहे. तसेच काही मालमत्तेची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर संजय राऊतांना ईडीने रात्री साडेबाराच्या सुमारास अटक केली. अटकेनंतर आज दुपारी राऊतांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावली आहे. न्यायालयात ईडीच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. तसेच संजय राऊतांवर ईडी वकिलांकडून अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत.

प्रविण राऊत हे केवळ फ्रंटमॅन होते, घोटाळा राऊतांनी केला. प्रविण राऊतांच्या कंपनीतून 1 कोटी संजय राऊतांच्या खात्यात, 50 कोटीतून 1 कोटी 6 लाख राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा केले. 2010-11 मध्ये राऊत दर महिन्याला प्रविण राऊतांकडून 2 लाख घ्यायचे, संजय राऊतांनी प्रविण राऊतांच्या कंपनीकडून 37 लाख दादरचे घर घेण्यासाठी घेतली, संजय राऊतांच्या विदेशी दौऱ्यासाठी देखील प्रविण राऊतांनी पैसे दिले, असे आरोप करत राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

दरम्यान, राऊतांच्या अटतेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांची पाठराखण करताना ठाकरे म्हणाले, संजय राऊत हे सच्चे शिवसैनिक आहेत. ते कोणापुढे झुकले नाहीत. मला त्यांचा अभिमान आहे. गुन्हा काय आहे संजयचा?, भाजप(BJP) सत्तेचा गैरवापर करीत आहे, असं ठाकरे राऊतांची बाजू संभाळताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

‘वार करायचा तर छातीत करायचा, पाठीत कशाला केेला?’, आदित्य ठाकरे आक्रमक

शिवसेनेबाबत जे.पी. नड्डांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More