बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

मुंबई | राज्यात सध्या भ्रष्टाचार, महिला अत्याचार या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चागलीच जुंपली आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीनं मुंबईमध्ये कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा केला होता. तेव्हापासून राज्यात चांगलंच वातावरण पेटलं आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासर्व प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना चांगलंच घेरलं आहे.

चित्रा वाघ सातत्यानं महाविकास आघाडीवर टीका करत असतात. 15 दिवसाची बाळंतीण आणि 8 महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचित उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्यापर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल, अशी जहरी टीका संजय राऊत यांच्यावर चित्रा वाघ यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सोमय्या यांना पत्र लिहून पिंपरी चिंचवडमधील घोटाळा बाहेर काढण्याची विनंती केली होती. परिणामी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना आपली लेखणी महिला संरक्षणावर लिहीण्यासाठी वापरण्याच आवाहन केलं आहे. चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर टीका करताना सध्या गाजत असणारं प्रकरण गांजाचा वापर केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं महिला सुरक्षेसाठी काहिच केलं नसल्याची सतत टीका होत होती. त्यामुळं राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता संजय राऊत यांच्याकडून चित्रा वाघ यांना काय उत्तर येतं हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

जखमी असतानाही कोलकाताचा ‘हा’ खेळाडू खेळला प्लेऑफचे सामने

‘आरोप सिद्ध झालेत आता त्यांनी राजीनामा द्यावा’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

अन् शाहरूख खानला झाला ‘त्या’ नियमांचा फायदा! आर्यनला धीर देत शाहरूख म्हणाला…

‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’; वानखेडे-मलिक वादात आता मनसेची उडी

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More