बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांकडे अदृश्य डोळे आहेत, धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते देखील संजय राऊतांना दिसतं”

पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज चंद्रकांत पाटील यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांची तुलना महाभारतातील संजयशी केली आहे.

संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत, त्यामुळे त्यांना सगळं दिसतं. नेत्याचं काम अदृश्य आहे. त्यामुळे ते फक्त संजय राऊतांनाचं दिसत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर उपरोधिक टोला लगावला आहे. तुम्हाला दिसतं काहो? तर नाही दिसतं. त्यांना सगळ दिसतं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत जोरदार निशाणा साधला आहे.

महिला अत्याचाराविरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील महिला नेता काम करत आहेत. हे केवळ संजय राऊतांनाच दिसतं. ते पाहण्यासाठी संजय राऊतांकडे अदृश्य डोळे आहेत, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संजय राऊतांना जे काम दिसतं ते सर्वसामान्य माणसांना दिसणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाभारतातील धृतराष्ट्राचं देखील उदाहरण दिलं आहे. महाभारतातील धृतराष्ट्राला जे दिसत नाही तेही संजय राऊतांना दिसतं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय उत्तर येतयं, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांचा आरोप हास्यास्पद, 50 वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने…”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

औरंगाबादमधील शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत; तब्बल 7 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

भारत आणि तालिबान एकाच मंचावर; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More