Top News महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत”

मुंबई | आजच्या सामना रोखठोकमधून मोदी शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राऊतांचा आरोप बिनबुडाचा आरोप आहे. वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत, असं म्हणत दरेकरांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं.

शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मोदींवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी राज्यातलं पाहावं. राज्याला सध्या फुल टाईम मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आम्ही पण म्हणू शकतो की एकच माणूस महाराष्ट्र चालवतोय. पण सरकारमधील मंत्री आणि पक्ष आपापल्या पद्धतीनुसार निर्णय घेत असतो. हा सरकार आणि पक्षीय पातळीवर ज्याचा त्याचा विषय आहे, असं दरेकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने पश्चिम रेल्वेला दिली हा इशारा!

अजिंक्य रहाणेच्या झुंजार फलंदाजीसमोर कांगारू बेजार; पहिल्या डावात भारताकडे आघाडी

 ‘या’ अटीशर्तींसह शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार!

भारतात पहिल्या टप्प्यात ‘इतक्या’ लाख लोकांचे लसीकरण होणार

 “…तरीही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचं कौतुक”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या