बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा मीडियावर हल्लाबोल

मुंबई | उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने 4 शेतकरी चिरडून मारले. पण यापेक्षाही या मंडळीला शाहरूखच्या पोराचे प्रताप महत्वाचे वाटतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मीडियावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचं रक्त यापेक्षाही श्रीमंतांच्या पोरांची अंमली पदार्थांची व्यसनं आणि थेरं कुणाला महत्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं, अशा कठोर शब्दात  राऊतांनी प्रसारमाध्यमांना सुनावलं आहे.

एकीकडे ड्रग्ज प्रकरणात शाहरूख खानच्या मुलाला झालेली अटक तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेला हिंसाचार हे दोन्ही मुद्दे गाजत आहेत. पण “उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं गेलं. यावर आवाज उठवण्याऐवजी मीडिया आर्यन खानच्या पाठीमागे धावला. इतकं मोठं मृत्यूकांड झालं पण मीडिया मात्र शाहरूखच्या पोराने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करत आहे,” असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

“शाहरूख खानचा मुलगा आणि त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचं कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच पण शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडियाने उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या हत्येवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला आहे,” असा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

मीडियासोबचत राऊतांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधलाय. “आपले प्रिय पंतप्रधान कमालीचे संवेदनशील तसेच भावनाशील व्यक्तिमत्व आहेत. त्यांना मानवता आणि गरीबाच्या हक्काविषयी कळवळा आहे. म्हणूनच त्यांना अनेकदा जाहिरपणे अश्रू ढाळताना जगानं पाहिलं आहे. त्या संवेदनशील मोदींनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्याविषयी संवेदना व्यक्त करू नये, याचं आश्र्चर्य वाटतं,” अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

3 बैठकीतही वाद मिटला नाही मग सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं अन्…; गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

“आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते”

सोशल मीडिया साईट्स तब्बल 6 तास डाऊन, सायबर हल्ला की…

आर्यन खानच्या अडचणी वाढल्या! न्यायालयाने वाढवली आणखी ‘इतक्या’ दिवसांची कोठडी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More