बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना दिली अहिल्याबाई होळकरांची उपमा, म्हणाले…

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील रोखठोक या स्तंभामधून भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवावर भाष्य केलंय. यात संजय राऊतांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकर यांच्याशी केली आहे.

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असं वातावरण देशात निर्माण केलं गेलं. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हतं. जे नव्हतं तेच बाईंनी पणाला लावलं. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल, असं राऊत म्हणाले. पश्चिम बंगाल निवडणुकीचे फलित काय? पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीत आणून ठेवलं. ते देशाचे पंतप्रधान. सर्वोच्च नेते म्हणून वागले नाहीत. त्यामुळे बंगालच्या लोकांना मोदींचं अप्रूप वाटलं नाही आणि ममतांसमोर उभ्या राहिलेल्या मोदींचा पराभव सहज झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मोदी किंवा शहांनी कितीही ताकद लावली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो हे प. बंगाल, केरळ व तामीळनाडूने दाखवून दिले. याचा अर्थ मोदी हे नक्कीच लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचे निवडणूक जिंकण्याचे व्यवस्थापन निर्दोष नाही. समोरचे कमजोर नेतृत्व, विरोधकांकडे साधनांची कमतरता हेच मोदी-शहांचे राजकीय बलस्थान आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचा एकतर्फी विजय झाला. निवडणूक आयोग, लाखोंच्या संख्येने उतरवलेले केंद्रीय सुरक्षा दल, सीबीआयसारख्या संस्थांचा वारेमाप वापरही भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोदी-शहा यांनी धार्मिक मतविभागणीसाठी ‘जय श्रीराम’ला प्रचारात उतरवलं. 25 वर्षांच्या देवांशू भट्टाचार्यने त्यावर ‘खेला होबे’चा उतारा दिला आणि पारडं फिरलं, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

“पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More