Top News

मी दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, हिंमत असेल तर अंगावर या- संजय राऊत

पुणे | कोणत्याही प्रसंगाला मी हिंमतीने सामोरं जातो. त्यामुळे समोर कितीही मोठा माणूस असू द्या त्याला मी घाबरत नाही. त्यामुळे हिंमत असेल तर माझ्यावर अंगावर या, असं प्रतिपादन शिवसेना खासदार  संजय राऊत यांनी केलं आहे.

लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलखुलास बातचीत केली. माणूस मृत्यूला किंवा तुरुंगात जायला घाबरतो. पण मी कशालाही घाबरत नाही. त्यामुळे कुणालाही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी पत्रकारीतेत आलो. मला पत्रकार म्हणवून घेण्यास आवडतं. पत्रकारीतेत असताना मुंबईतील गॅगवाॅर जवळून पाहता आला. मी गँगस्टर दाऊद इब्राहिमला सुद्धा दम भरलाय, असं राऊत म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर माझा खूप विश्वास आहे. तसेच राज ठाकरे अजूनही माझे चांगले मित्र आहेत, अशी दिलखुलास उत्तरं संजय राऊतांनी दिली आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवारच ‘जाणता राजा’च; मुंबईत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या