Top News महाराष्ट्र मुंबई

हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई |  विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. परंतू आता विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील आमदार म्हणून निवड झाल्याने हा वाद शमला आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला पोहचले आहेत.

संजय राऊतांच्या राज्यपालांच्या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हे कारण काय असू शकतं यावरून राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. पण भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होते आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

विधानपरिषद निवडणुकीवेळी संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून थेट राजभवनावर टीकेचे बाण सोडले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं थेट नाव घेऊन घटनात्मक पदाला साजेशी कामगिरी राज्यपाल करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झालीये. त्यामुळे शिवसेना-राज्यपाल आता कटुता राहिलेली नाहीये. राऊतांची ही सदिच्छा भेट असू शकते, असा तर्क लावण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन करणाऱ्या पोस्ट टाकाल तर….; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

कोरोनाचा शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या