Sanjay Raut | राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीदिवशी अनेक ट्विस्ट घडताना दिसत आहेत. अनेकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. मात्र आता विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्यात हस्तांदोलन होताना दिसत आहेत. गप्पागोष्टी होताना दिसत आहेत. ते इतर दुसरे तिसरे कोणीही नसून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील आहेत. तसेच दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवारांनी हस्तांदोलन केलं आहे.
संजय राऊतांचे महायुतीच्या नेत्यांच्या गळ्यात गळे
सकाळचा भोंगा म्हणून अनेकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. तसेच अजित पवार यांनी देखील अनेकदा संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. याचप्रमाणे भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) गळ्यात हात घातला असल्याचा व्हिडीओत दिसून आलं आहे.
विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत 246 मतदान झाले आहे. यावेळी मतदानानंतर राज्याच्या राजकीय नेत्यांमध्ये हसत खेळत गप्पा दिसून आल्या आहेत. विधानभवनात आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसतखेळत गप्पा मारल्यानंतर या भेटीचे व्हिडीओ समोर आले आहे. त्या व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
अशातच आता अजित पवारांनी जयंत पाटील यांच्यासोबत हसत खेळत गप्पा गोष्टी केल्या असल्याचं दिसून आलं आहे. तसेच अजित पवार आणि संजय राऊत (Sanjay Raut) देखील एकत्र दिसले आहेत. विधानपरिषदेच्या या दोन्ही भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत. मात्र ही एक अनावधानाने झालेली भेट असल्याचं म्हटलं जातंय.
आपण पुन्हा एकत्र यायला हवं – संजय राऊत
विधान भवनाच्या पायऱ्यांवर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की तुम्हाला पाहूण मी पुन्हा इकडे आलो आहे. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की, अरे व्वा… आपण पुन्हा एकदा एकत्र यायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत आणि महायुतीच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी भेटीवर सांगितलं की आम्ही भेटत असतोच. आम्ही याआधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत देखील भेट घेतली होती.
News Title – Sanjay Raut Meet With Jayant Patil Meet With Ajit Pawar And Chandrakant Patil On Vidhan Bhavan Staircase
महत्त्वाच्या बातम्या
सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण
प्री-वेडिंगवरच हजार कोटी उडवले, लग्नासाठी तर तब्बल..; अंबानींच्या लग्नातील खर्चाचा आकडा समोर
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?