संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; ठाकरे सरकारच्या कामावर राहुल गांधी समाधानी
नवी दिल्ली | सध्या दिल्लीत लोकसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे सर्व खासदार आणि प्रमुख नेते दिल्लीत आहेत. नेत्यांच्या भेटीगाठीमुळे आता दिल्लीचं वातावरण तापलेलं दिसतंय. काही दिवसांपुर्वी 14 पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेतल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राहुल गांधी यांच्याशी सोमवारी भेट झाली. राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. राज्य सरकारच्या कामाविषयी त्यांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतलं, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
राहुल गांधी आणि संजय राऊत यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर त्याच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधीचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांचं मन बळवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या काही काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. फेब्रुवारीत या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे आता शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा थेट सामना असणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेस वेगळी लढली तर शिवसेनेला नुकसानच होईल. त्यामुळे याविषयी चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाहा ट्विट-
थोडक्यात बातम्या-
उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा
ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात येतील- अजित पवार
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’
…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments are closed.