“बंटी बबली मुंबईत पोहोचले तर पोहचू द्या, त्यांना अजून…”
मुंबई | अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील वातावरण तापलं असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राणा दांपत्यांचा ‘बंटी बबली’ असा उल्लेख करत संजय राऊतांनी टीका केली आहे.
बंटी बबली जर पोहोचले असतील तर आम्हाला काही हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे. हे फिल्मी लोक आहेत. स्टंटबाजी म्हणा किंवा मार्केटिंग करणं हे त्यांचं काम आहे. आणि भाजपला (BJP) त्यांची मार्केटिंग करण्यासाठी आता अशा लोकांची गरज भासत आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले आहेत. तर राणा दांपत्याला काय स्टंट करायचे आहेत करू द्या. त्यांना अजून शिवसेनेचं मुंबईचं पाणी माहिती नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘भाजप इतका जूना पक्ष की…’; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात, आता…
रशियाची मोठी खेळी, रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळणार?
राष्ट्रवादीच्या आमदाराकडूनच पक्षाला घरचा आहेर, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.