“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. यामध्ये अक्षय शिंदे हा ठार झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी वेगवेगळे सवाल करण्यास सुरुवात केली आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत मोठा आरोप केला आहे. आज (24 सप्टेंबर) ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काही सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut )

“पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणार. ती लॉक झालेली बंदुक फायर करणार हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला?” , असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“कोणाला तरी वाचवायचंय. ज्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. शाळेचं सीसीटीव्ही फुटेज का काढलं? साीसीटीव्ही फुटेज ज्याला मारलं त्याने काढलेलं नाही. शाळेच्या संस्था चालकाने ते फुटेज काढून टाकलं. ही शाळेची संस्था भाजपाशी संबंधित आहे. हे सगळे शिंदे, फडणवीसांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हे सर्व केलं”, असा आरोपच संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut )

अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर हे मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी झालं आहे. संडास साफ करणारा मुलगा कधीपासून बंदूक चालू लागला?, या सरकारने मुख्य पुरावा नष्ट केला, असं राऊत म्हणाले आहेत.  हजारो बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरुन त्यादिवशी सरकारकडे एकच मागणी केली, आरोपीला आताच्या आता फाशी द्या. मंत्र्यांना पिटाळून लावलं. अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. जनता इतकी संतप्त होती, ही लोक भावना आहे, असंही राऊत म्हणाले.

नेमकं घडलं काय?

बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये मोठा राडा झाला होता. नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या प्रकरणी तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात सोमवारी झालेल्या एका चकमकीत आरोपी अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला आहे. त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.त्यात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदे ठार झाला आहे. (Sanjay Raut )

News Title : Sanjay Raut on Akshay Shinde encounter

महत्वाच्या बातम्या –

एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते?, आईने केला मोठा खुलासा

“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप

“…तेव्हाच खऱ्या अर्थाने बदला पूर्ण होईल”, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचं बक्षीस, कुणी केली घोषणा?

आज कालाष्टमी, काल भैरव ‘या’ राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करणार!