Top News महाराष्ट्र मुंबई

घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत

मुंबई | ‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. यावर राऊतांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है, म्हणत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, जेव्हा जास्त गर्व केला जातो तेव्हा तो व्यक्तीच राहत नाही असं राऊत म्हणाले. राऊतांच्या या ट्विटवर भाजपकडून काही प्रत्युत्तर येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

जवान पतीला फेसबुकवर ‘आयुष्यभराचं चॅलेंज’ दिलं, मात्र नियतीला ते मान्य नव्हतं!

दिलदार पंत! उत्तराखंडामधील पीडितांना केली मोठी मदत जाही

“कलाकार एकेकाळी भाई लोकांच्या इशाऱ्यावर चालायचे, केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरु केली?”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या