मुंबई | भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
जाहीरनाम्यात उल्लेख केलेल्या मोफत लसीच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. कोरोना व्हायरसची लस केवळ भाजपशासित राज्यांमधील लोकांनाच मोफत मिळणार का, असा सवाल राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही शाळेत असताना पुस्तकांमध्ये ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा वाचली होती. मात्र आता भाजपचा ‘तुम्ही मला व्होट द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ’ असा नारा आहे.”
“भाजपाने बिहारच्या निवडणुकीत तेथील लोकांना मोफत लस देणार असल्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देणारा आहे,” असंही राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
…तर त्या देशाला मोठी किंमत मोजावी लागेल- जो बायडेन
आज एकनाथ खडसेंचा जाहीररित्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार!
मुंबई- सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नितांडव, 11 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
विनयभंगाच्या तक्रारीतून खडसे अजून सुटलेले नाहीत- अंजली दमानिया
पक्ष सोडण्याची वेळ का आली याचं खडसेंनी आत्मचिंतन करावं; गिरीश महाजनांचा टोला
Comments are closed.