बिहार | आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बिहारच्या एकूण 243 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.
दरम्यान यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, बिहार निवडणूकीचे निकाल अजून पूर्ण यायचे बाकी आहेत. सध्या जे कल पाहिले आहेत त्यावरून एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केलीये.
राऊत पुढे म्हणाले, “मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल त्यावेळी लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू असेल.”
कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक मानली जातेय. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं असून नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार का हे आज स्पष्ट होणारे.
महत्वाच्या बातम्या-
बिहार निवडणूक- महाआघाडीला लाडू पचणार नाहीत, शाहनवाज हुसैन यांची टीका
भाजपने मेधा कुलकर्णींना पुन्हा डावलले; विधान परिषदेची उमेदवारी नाहीच
बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!
बिहार निवडणूक निकाल- प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर