2019ला भाजपचा सूड घ्यायचाय, संजय राऊत यांची भाषा

पुणे | भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भगव्याचा अपमान केला आहे. 2019च्या निवडणुकीत त्यांचा सूड घ्यायचा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

जे मोदी लाटेत निवडून आले त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असं आदेशही त्यांनी यावेळी दिले. 

भाजप आमदार आणि खासदारांची कामं दिसत नाही. त्यांचं एकच काम सुरु असतं, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे थाप मारणे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.