Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (9 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत विविध विषयांवरून भाजपला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेतली. मात्र, ठाकरेंच्या या दौऱ्यावर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. जेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जातात, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करतात.मात्र, आता ते स्वतः दिल्लीचे दौरे करत आहेत असं म्हणत भाजपकडून टीका करण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut )यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.
“उद्धव ठाकरे माझे मित्र म्हणून माझ्या घरी आले आणि दिल्ली काय त्यांच्या बापाची आहे का?, उद्धव ठाकरे यांना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं. त्यांनी इथे सर्वांची भेट घेतली. मग आम्ही भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का?”,असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
“उद्धव ठाकरे उत्तम कलाकार आहेत”
“उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भेटी या आराजकीय होत्या. आम्ही कपिल सिब्बल यांची देखील भेट घेतली. त्यांच्या घरी उत्तम चित्रे, संगीताचा खजाना, ग्रंथालय आहे. आम्ही यावर चर्चा केली. उद्धव ठाकरे कलाकार आहेत.”, असंही राऊत म्हणाले.
पुढे त्यांनी कुस्तीपटू विनेश फोगाटबद्दल देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपचा साहित्य, कला, क्रीडा याच्याशी संबंध आला असता तर, विनेश फोगाटचं पदक गेलं नसतं. विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत आहे. तिचं पदक गेल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.”, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut )यांनी केली आहे.
“विनेश फोगाटचं पदक घालवायला भाजप कारणीभूत”
दरम्यान, भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हीने पॅरिस ऑलम्पिकच्या (Paris Olympics 2024) महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम सामन्यापुर्वी तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे विनेश फोगाटचं पदक हुकलं. यामुळे भारतीयांची मोठी निराशा झाली. यावरच बोलताना राऊत यांनी भाजपवर आरोप केले.
संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत देखील भाष्य केलं. “तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी असं ठरवलंय की सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थिती राज्यातून खोके सरकार घालवायचं आहे, भाजपला राज्यातून हद्दपार करायचंय.”, असं संजय राऊत (Sanjay Raut )म्हणाले.
News Title : Sanjay Raut on bjp over Vinesh Phogat medal
महत्त्वाच्या बातम्या-
“खोके सरकारला शेख हसीना यांच्यासारखं पळवून..”; संजय राऊतांचा हल्लाबोल
नागपंचमी सणाला नागदेवतांची पूजा ‘या’ वेळेपर्यंत करा; मिळतील शुभ संकेत
नागदेवता या दोन राशींवर होणार प्रसन्न; मिळणार आनंदाची बातमी
कायम पैशांच्या मागे पळणं सोडा, आयुष्यात यश मिळवण्यासाठी ‘हे’ लक्षात ठेवा!
समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’