Top News राजकारण

शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणालेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही. इतक्या छोट्या नेत्याला केंद्र सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिलाय. कदाचित हे पाटील यांना माहित नसावं.”

“चंद्रकांत पाटील आणि भाजपामध्ये वैचारिक दरी निर्माण झाली असावी. किंवा मोदी सांगतायत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. किंवा नरेंद्र मोदींना हे जुमानत नाही असं दिसत,” असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.

राजकारणात येण्यापूर्वी पवार मला मोठे नेते वाटायचे. परंतु राजकारणात आल्यावर कळलं ते फार छोटे नेते असून त्यांचा अभ्यासही नसतो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल- देवेंद्र फडणवीस

“चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी झालीये”

“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या