Top News

…तर नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतो- संजय राऊत

मुंबई | आम्हाला कुणीही राष्ट्रभक्ती शिकवू नये, जे मानवतेच्या हिताचं आहे, तोच आमचा निर्णय असेल, असं शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असे संकेत संजय राऊतांनी दिले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आम्ही सदनात आमचा मुद्दा मांडू, सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळालं, तर ठीक, अन्यथा आमचा निर्णय वेगळा असेल. लोकसभेतील संख्याबळ वेगळं होतं, राज्यसभेत वेगळी स्थिती आहे. तेव्हाचा निर्णय तेव्हा घेऊ, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

आम्हाला कुणीही राष्ट्रभक्तीबाबत मार्गदर्शन करु नये. जितका त्याग तुम्ही केला, त्यापेक्षा जास्त आम्ही केला. दर वेळी पाकिस्तानची भाषा, बांगलादेशची भाषा.. या देशाचीही एक भाषा आहे. नेपाळमध्ये हिंदूंची अवस्था बिकट आहे. श्रीलंकेतील हिंदूंना का वगळलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले.

आपल्या देशाचे नागरिकही राष्ट्रभक्त आहेत, त्यांना कुठल्याही शाळेत राष्ट्रभक्ती शिकण्याची गरज नाही. आम्हीही खूप काही सहन केलं आहे. तुम्ही व्होट बँकेचं राजकारण करु नका, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या