मुंबई | भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले, “कोरोना व्हायरसची लस प्रत्येक व्यक्तीला मोफत मिळावी ही आमची देखील इच्छा आहे. मात्र आमचे मुख्यमंत्री कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत.”
दरम्यान, शिवसेनेसाठी आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा आहे. सर्वत्र कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर महापूर आला असता, असंही राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली आहे. आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिलीये.
महत्त्वाच्या बातम्या
चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत
“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”
धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या
एकनाथ खडसेंचं ‘ते’ वक्तव्य पटण्यासारखं नाही- रावसाहेब दानवे
“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”
Comments are closed.